सांगली : स्त्रीभ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉ. बाबासाहेब खिद्रापूरेला बेळगावमधून अटक करण्यात आली. खिद्रापूरेला न्यायालयात हजर केल्यावर त्याला 10 दिवसांची पोलrस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात खिद्रापुरेच्या हॉस्पिटलजवळ 19 अर्भकांचे अवशेष जमीनत पुरलेल्या अवस्थेत सापडले. तेव्हापासून बाबासाहेब खिद्रपुरे फरार होता. अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला बेळगावमधून अटक केलीय.
याप्रकरणी सोमवारी खिद्रापूरेच्या हॉस्पिटलवर छापा घातला. तपासासाठी सांगली पोलिसांनी पाच पथकं तयार केली होती. अखेर मिरजच्या ग्रामीण पोलिसांनी बेळगावात दडून बसलेल्या खिद्रापुरेला मध्यरात्री अटक केली. या प्रकरणात आणखी पाच डॉक्टर आणि तीन एजंट पोलिसांच्या रडारवर आहेत.
खिद्रापूरे आणि त्याच्या कुठल्याही साथीदाराला कठोरातली कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला आहे.