औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या मार्केटला मोठी आग

औरंगाबादच्या सर्वात मोठ्या फटाक्याच्या मार्केटला आज भीषण आग लागलीय. साधारण दीडतासापूर्वी लागलेल्या आगीवर आता नियंत्रण आणण्यात यश आलंय. 

Updated: Oct 29, 2016, 01:04 PM IST
औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या मार्केटला मोठी आग title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या सर्वात मोठ्या फटाक्याच्या मार्केटला आज भीषण आग लागलीय. साधारण दीडतासापूर्वी लागलेल्या आगीवर आता नियंत्रण आणण्यात यश आलंय. 

जिल्हापरिषदेच्या मैदानात असणाऱ्या जवळपास 150 दुकाननं आगीच्या भक्ष्यस्थानी आली. दिवाळीचे दिवस असल्यानं सगळ्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके होते. 

आग लागल्यावर फटाके फुटायला लागल्यांनं मोठे आवाज होऊ लागले. आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणारे नागरिक प्रचंड प्रमाणात धास्तावलेत. या आगीत 20 कार, 30 ते 40 दुचाकी आणि पाच रिक्षा या आगीत आतापर्यंत जळून खाक झाल्या आहेत. अद्याप जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही. पण बहुतांश लोक वेळीच बाहेर पडल्याचं चित्र सध्या पुढे आहेत.