विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण : कल्याण पश्चिमेच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आज पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे.
आसपासच्या परिसरातून या आगीच्या धुराचे मोठमोठाले लोट दिसत असून महापालिकेचे अग्निशमन दल ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
डम्पिंगवरील कचऱ्याला लागणारी आग ही नविन गोष्ट नसून वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डम्पिंगवर आग लागू नये याकरिता फवारणीसाठी महापालिकेने विशेष कंत्राटदारही नेमला आहे. मात्र त्यानंतरही कचऱ्याला आग कशी लागते? हा खरा प्रश्न आहे. दरम्यान डम्पिंगची आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागत असून 2 दोन गाड्या आणि 2 टँकर च्या साहाय्याने आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत..
दुसरीकडे एखादी मोठी दुर्घटना घडून नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार का? अशी विचारणा होत आहे.