पुणे : वधू पित्यानं नव्या जावयाला काय काय दिलं... हा प्रश्न प्रत्येक लग्नानंतर प्रत्येक घरात चर्चिला जाणारा विषय... पिंपरीतल्या अशाच एका लग्नात नव्या जावयला काय काय मिळालं हे जर ऐकलं, तर असे सासरे सगळ्यांना मिळू दे अशी प्रार्थना भावी नवरे केल्याशिवाय राहणार नाहीत.
रावेत मधल्या समीर लॉन्समध्ये नुकत्याच पारपडलेल्या एका लग्नात नव्या जावयाला एक फॉर्च्युनर, एक ऑडी आणि १२ बुलेट अशी भरभक्कम भेट सासरेबुवांनी दिली.
वडगाव शहातले उद्योजक बाबूराव वायकर यांचा मुलगा अक्षय याला त्याच्या सासऱ्यांनी हा अनोखी भेट दिलीय.
शिवाय आलेल्या प्रत्येक पाहुण्याला एक सोन्याची अंगठीही देण्यात आली. वधूचं औक्षण करणाऱ्यांना एक अॅक्टिव्हा गाडीही सासरेबुवांनी भेट दिली.