सांगली : मिरजेत गॅस्ट्रोचा चौथा बळी गेलाय. मागील तीन दिवसात अस्लम नदाफ, रमेश पाटील आणि अब्दुल लतीफ या तिघांचागॅस्ट्रोने मृत्यू झाला आहे. तर पाचशे रुग्ण हे विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.
रुग्णांनी दवाखाने फुल्ल झाल्यामुळे, कॉट शिल्लक नाहीत. अनेक रुग्णांना व्हरांड्यात जमिनीवर सतरंजी टाकून उपचार करण्यातयेत आहेत. तसेच दवाखान्याच्या जवळील दुकानात सुद्धा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महापालिकेकडून होणा-या दुषित पाण्यामुळे नागरीकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे.
एकीकडे शहरात गॅस्ट्रोची साथ पसरली असताना, महापालीकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादीचे नगरसेवक हे स्थायी समिती आणि महापौर निवडी प्रक्रियेत गुंतले आहेत, तर भाजपचे आमदार आणि खासदार हे सत्कार समारंभात मश्गुल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांतून नेत्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.