बदलापूर : बदलापूर शहरातील 'सागर इन्व्हेस्टमेंट' या गुंतवणूक कंपनीनं हजारो नागरिकांचे तब्बल अंदाजे ३०० कोटी रुपये बुडवले आहेत. गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळत नसल्याने ते पुरते धास्तावले आहेत.
बदलापुरात तीस वर्षांपूर्वी श्रीराम समुद्र यांनी सागर इन्व्हेस्टमेंट या नावाने गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. जास्त व्याजदर देण्याच्या त्यांच्या अमिषाला हजारो नागारिक भुलले आणि त्यांनी सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली.
अनेकांनी निवृत्तीनंतर त्यांना मिळाले पैसे, तर काहींनी पेन्शनचे पैसे यात गुंतवले. आधी श्रीराम समुद्र यानं लोकांना त्यांच्या गुंतवणूकीवर व्याजही दिलं. मात्र, आता समुद्र गायब झाल्यानं अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.
या प्रकरणी गुंतवणूकदरांनी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र पोलीस तक्रार दाखल करुन घ्यायला टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केलाय. दरम्यान, या गुंतवणूकदारांनी कायदेशीर लढाईसह उपोषणाचा हत्यार उपसण्याचा निर्णय घेतलाय.