फ्लॅट, नोकरी मिळवून देणाऱ्या तोतयाला अटक

केंद्राच्या दक्षता विभागाचा अधिकारी बनून लोकांना फसवणाऱ्या विशाल ओंबाळे नावाच्या एका तोतयाला पुणे पोलिसांनी जेरबंद केलंय. 

Updated: Nov 25, 2015, 09:43 AM IST
फ्लॅट, नोकरी मिळवून देणाऱ्या तोतयाला अटक title=

पुणे : केंद्राच्या दक्षता विभागाचा अधिकारी बनून लोकांना फसवणाऱ्या विशाल ओंबाळे नावाच्या एका तोतयाला पुणे पोलिसांनी जेरबंद केलंय. 

लाल दिव्याची गाडी, आणि सात आठ बाऊन्सर घेऊन नागरिकांना धमकावून विशाल ओंबाळे त्यांच्याकडून पैसे उकळायचा. तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि एका दुकानदाराला तब्बल ३० हजार रुपयांचा गंडा घालताना ओंबाळाले रंगेहात पकडलंय. 

तोतया अधिकारी बनून लोकांना फसवण्या व्यतिरिक्त सरकारी कोट्यातून फ्लॅट देतो, नोकरीला लावतो अशी आमिष दाखवूनही ओंबाळेनं अनेकांना गंडा घातलाय.

ओंबाळेंनं वसई-विरारपासून अनेकांना फसलवलंय. फसवणूकीचे पाच गुन्हे याआधीच त्यावर दाखल आहेत. दहावीत नापास झाल्यावर काही दिवस तो हॉटेलात धुणी-भांडी करत असे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.