पुणे : पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी थेट तहसील कचेरीवर मोर्चा काढला. पाणी समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उत्स्फूर्तपणे त्यांनी हे आंदोलन केलं.
इंदापूरमधल्या भिमाई आश्रमशाळेतल्या मुलांना आठवडाभरापासून प्यायला पाणी नाही. अनेक वेळा मागणी करूनही पाणी मिळत नसल्यानं, रविवार असूनही आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी थेट तहसील कचेरीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं.
यावेळी मुलांनी अगतिकपणे ठोकलेल्या पाणी द्याच्या आरोळ्यांनी परिसर दणाणून गेला. शाळेत पाण्याचा टॅंकर त्वरीत पोहोचवण्याची त्यांची मागणी आहे. आश्रमशाळेसाठी दोन विहिरी आणि चार विंधन विहिरी आहेत. मात्र विहिरीतलं पाणी आटल्यानं विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.