यवतमाळ शेतकऱ्यांची स्थिती बिकट, CMचे आदेश धाब्यावर

सलग तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीनं यवतमाळ ल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांच्या आदेशाकडे राष्ट्रीयकृत बँकांनीच कानाडोळा केला आहे. 

Updated: Jul 13, 2015, 11:58 AM IST
यवतमाळ शेतकऱ्यांची स्थिती बिकट, CMचे आदेश धाब्यावर title=

श्रीकांत राऊत, यवतमाळ : सलग तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीनं यवतमाळ ल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांच्या आदेशाकडे राष्ट्रीयकृत बँकांनीच कानाडोळा केला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील जाम इथले शेतकरी देवा राऊत. ९ एकर शेतजमिनीचे मालक असलेले देवा राऊत, गेल्या ३ वर्षांपासूनच्या नैसर्गिक संकटापुढे पुरते हतबल झालेत. गेल्या वर्षी देवा राऊत यांना राष्ट्रीयकृत बँकेनं कर्ज नाकारलं. मात्र यावर्षी कर्ज पूनर्गठण तसंच जुनं कर्ज असलं तरी नवं कर्ज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. म्हणून पुन्हा बँकेकडे गेलेल्या राऊत यांना, तिथं उडवाउडवीची उत्तरं मिळाली. त्यामुळे खासगी आणि सावकारी कर्जाशिवाय त्यांना दुसरा मार्ग शिल्लक नाही. अशाप्रकारे कोंडी झालेल्या शेतकऱ्यांचं जिल्ह्यातलं प्रमाण तब्बल सत्तर टक्के इतकं आहे. 

राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांचं किती हित जोपासतात हेच यावरुन दिसून येतं. बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज द्यायला नकार दिला आहे. तर काहींना सावकारांनीही कर्ज नाकारलं आहे. अशातच पेरलेली बी जमिनीतच करपली आहे. त्यामुळे परत दुबार पेरणीला कसं सामोरे जायचं ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. 
 
गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी कर्जासाठी बँकांत गर्दी करत आहेत. मात्र कर्ज पुनर्गठण करण्याकडे बँका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती इकडे आड तिकडे विहिर अशी झाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.