पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा लेझिमबरोबर वाजणा-या टोलचा आवाज ऐकू येणार नाही. कारण यावर बंदी घालण्यात आली आहे.
ढोल-ताशा पथकांमधल्या कान किटवणा-या टोलवर यंदा पूर्ण बंदी आणल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी स्पष्ट केलंय. टोल ध्वनी प्रदुषणात प्रचंड भर घालत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.
उत्सवाच्या काळात टोल वाजवला जातोय असं लक्षात आल्यास पोलीस तो जप्त करतील आणि सहकार्य न करणा-या मंडळांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही माथुर यांनी यावेळी माहिती देताना स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.