भंडारा : पैशांसाठी जन्मदात्या आईनं लेकीचा सौदा केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवाजी वॉर्डात ही घटना घडलीय.
अवघ्या सोळा वर्षाच्या या अल्पवयीन मुलीला तिच्याच आईने फक्त 20 हजारासाठी विकलं. राजस्थानमधील एका इसमासोबत तिचं लग्नही लावून देण्यात आलं. इतकंच नाही तर या मुलीवर अत्याचारही करण्यात करण्यात आल्याचं समोर आलंय.
या मुलीने कशीबशी आपली सुटका करुन घेतली आणि नागपूर गाठलं. रेल्वे पोलिसांना तिने सगळा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.
याप्रकरणी या मुलीची आई, तिची बहिण आणि अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या बचावात, या मुलीला व्यसन जडल्याने ती असे आरोप करत असल्याचा दावा तिच्या आई आणि बहिणीने केलाय.