जळगाव : चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्याच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव चांगलेच वाढले होते. ३० हजारावरुन सोन्याचा भाव तब्बल ३४ हजार प्रतितोळ्यांवर पोहोचला होतो.
मात्र आता सोन्याचे भाव पुन्हा खाली आलेत. सोन्याच्या दरात घसरण होत ते ३० हजार रुपयांपर्यंत आलेत.
मोदींनी नोटांवरील बंदीची घोषणा केल्यानंतर अनेकांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला होता. त्यामुळे सोन्याचे ५० हजारापर्यंत पोहचले होते. मात्र दिल्लीमध्ये आयकर विभागानं सराफ दुकानांवर टाकलेल्या धाडीमुळे सराफ व्यवसायिकही चांगलेच घाबरलेत.