गुड मॉर्निंग पथकाची उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई

 सिल्लोड गावात नगरपालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं आणि पोलिसांनी एक उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांवर कारवाई केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2017, 07:13 PM IST
गुड मॉर्निंग पथकाची उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई title=

औरंगाबाद : सिल्लोड गावात नगरपालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं आणि पोलिसांनी एक उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांवर कारवाई केली. उघड्यावर शौचास बसणा-या या 23 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना कोर्टात सुद्धा हजर करण्यात आलं. 

बॉम्बे पोलिस अँक्टच्या कलम 115,117 अंतर्गत उघड्यावर शौचास बसणे हा गुन्हा आणि दंडात्मक कारवाईसाठी पात्र आहे. त्यामुळे या 23 जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणात कोर्टानं सगळ्या आरोपींना 400 रुपयांचा दंड ठोठावून सुटका केली.