कैद्याच्या मृत्यू प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

 कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2017, 06:49 PM IST
कैद्याच्या मृत्यू प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा title=

कोल्हापूर :  कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वडगावच्या सनी पवारचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता.

 या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक बबन शिंदे आणि पोलीस नाईक धनाजी पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. 

पोलिसांकडून आरोपींना झालेल्या मारहाणीच्या बातम्या आपण ऐकत असतो, मात्र हे आरोप सिद्ध झाले, तर ते प्रकरण किती गंभीर स्वरूपाचं असतं, हे वरील प्रकारणावरून लक्षात येतं.