धुळे : पोलिसांसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे. कारण सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर त्यांना त्या दिवशी दुप्पट पगार दिला जाणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही घोषणा केली.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्यात पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी राम शिंदे बोलत होते. सध्या सुट्ट्याच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर फक्त 68 रुपये भत्ता मिळतो. मात्र यापुढे पोलिसांना त्या दिवसासाठी दुप्पट पगार दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
याशिवाय सुमारे २० हजार पोलिसांना शासकीय निवासस्थान मिळालं नाही,अशी कबुलीही गृहराज्यमंत्र्यांनी दिलीय. त्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.