गुहागरमध्ये बिबट्या विहिरीत पडला

 गुहागरमधील पांगारी भोईवाडीमधीलसार्वजनिक विहिरिमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाच्या अधिका-याना यश आले आहे.पिंज-याचा वापर करून बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले.

Updated: Apr 25, 2015, 10:55 PM IST
गुहागरमध्ये बिबट्या विहिरीत पडला title=

रत्नागिरी : गुहागरमधील पांगारी भोईवाडीमधीलसार्वजनिक विहिरिमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाच्या अधिका-याना यश आले आहे.पिंज-याचा वापर करून बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले.

पांगारी भोईवाडी येथील स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील बिबट्याला तीन तासांनी बाहेर काढण्यात आले. या बिबट्याला कोयनेतील अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी पाटील यांनी दिली.

दरम्यान, बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर त्याला बोटीने आणण्यात आले. जवळपास अर्धातास बोटीतून बिबट्याचा प्रवास झाला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.