औरंगाबाद : पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी एक वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेविरोधात कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आता वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत.
सरकारी कामात अडथळा आणण्याचा आरोप जाधव यांच्यावर सिद्ध झालाय. आणि याचप्रकरणी त्यांना एक वर्ष सक्त मजुरी आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.
5 जानेवारी 2011रोजी मनसेमध्ये असताना जाधवांनी मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात गाडी घालून पोलिसांना मारहाण आणि शिवीगाळ करत अडथळा आणला होता.
दरम्यान, खरे दोषी पोलिसच आहेत, दुर्दैवानं मला शिक्षा झाल्याचं जाधवांनी म्हटले आहे.