एक महिन्याआधीपासून हसनेन करत होता प्लॅनिंग

ठाणे हत्याकांड प्रकरणातील हसनेन वरेकरने हत्याकांडापूर्वी घरातील व्यक्तींना गुंगीच औषध दिले होते असे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. इतकंच नव्हे तर ज्या औषधाचे नमुने हसनेनच्या कुटुंबियांच्या रक्तात आढळले त्याची माहिती तो महिन्याभर आधीपासून मिळवत होता. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात त्याचे सर्चही केले होते. 

Updated: Mar 13, 2016, 11:16 AM IST
एक महिन्याआधीपासून हसनेन करत होता प्लॅनिंग title=

ठाणे : ठाणे हत्याकांड प्रकरणातील हसनेन वरेकरने हत्याकांडापूर्वी घरातील व्यक्तींना गुंगीच औषध दिले होते असे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. इतकंच नव्हे तर ज्या औषधाचे नमुने हसनेनच्या कुटुंबियांच्या रक्तात आढळले त्याची माहिती तो महिन्याभर आधीपासून मिळवत होता. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात त्याचे सर्चही केले होते. 

गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या कासारवडवली भागात हसनेन वरेकरने आपल्या घरातील १४ जणांची निर्घृण हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. हत्याकांडापूर्वी रात्री त्याने दावतसाठी बहिणी, त्यांच्या मुलांना घरी बोलावले होते. मात्र त्यानंतर त्याने सर्वांची धारदार शस्त्राने हत्या केली. यात त्याची एक बहिण मात्र बचावली.

 

वरिष्ठ पोलिसांना तपासादरम्यान आढळलेल्या माहितीनुसार, हसनेनच्या कुटुंबियांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्या रिपोर्टनुसार हसनेन वगळता सर्वांच्या शरीरात गुंगीच्या औषधाचे नमुने आढळले. या हत्याकांडाचे प्लॅनिंग एक महिन्यापूर्वीपासून तो करत होता. क्लोंझेपॅम या नावाचे औषध त्यांच्या रक्तात आढळले. हत्याकांडाच्या आठवड्याभरापूर्वी हसनेनने या औषधाबाबत माहितीही गोळा केली होती. 

दरम्यान, हाती आलेल्या रिपोर्टनुसार कोणाच्याही शरीरावर लैंगिक अत्याचार केल्याच्या खुणाही आढळले नसल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.