अकोला : अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
जिल्हा रुग्णालयानं मृत अर्भकाऐवजी चक्क जिवंत अर्भक आप्तेष्टांच्या ताब्यात देण्याची खळबळजनक घटना समोर आलीय. मात्र, अर्भकाचं दैव बलवत्तर असल्यानं ती जिवंत असल्याचं लक्षात आल्यानं पुढील अनर्थ टळलाय.
चीड आणणाऱ्या या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासनानं एक त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केलीय. या समितीला १८ जानेवारीपर्यंत आपला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आलेत.