चिपळुणात शिकाऱ्याची शिकार, निनावी पत्राने हत्या उघड

जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शिका-याची शिकार झाली. चिपळूण तालुक्यातील कळवंडेच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एकाची त्यांच्या साथीदारांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Updated: Dec 16, 2015, 03:32 PM IST
चिपळुणात शिकाऱ्याची शिकार, निनावी पत्राने हत्या उघड title=

रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शिका-याची शिकार झाली. चिपळूण तालुक्यातील कळवंडेच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एकाची त्यांच्या साथीदारांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

२८ नोव्हेंबरला सुनील बाळाराम जावळे आणि त्याचे ८ साथीदार शिकारीसाठी जंगलात गेले होते. मात्र ज्या शिकारीसाठी ते जंगलात गेले होते त्याच ठिकाणी सुनील जावळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. 

मात्र, चिपळूण पोलिसांना आलेल्या एका निनावी अर्जाने हे सगळं बिंग फुटलं. या अर्जाच्या सहाय्याने चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी तपास सुरू केला आणि तब्बल ८ जणांची नावं यात समोर आली असून त्यांना चिपळूण पोलिसांनी अटक केली.

तसेच शिकारीसाठी वापण्यात अलेली बंदूक आणि उर्वरित साहित्य जप्त केलं जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. यात आतापर्यंत चिपळूण पोलिसांनी ८ जणांना अटक केली.

त्यामध्ये मिलिंद जावळे, संदेश शिगवण, प्रकाश शिगवण, गंगाराम नाचरे, विजय नाचरे, मंगेश नाचरे, विशाल कदम आणि संदीप धनावडे याचा समावेश आहे. नेमकी हत्या कशी झाली आणि हे प्रकरण दाबण्यात का आलंय, याची चौकशी सध्या चिपळूण पोलिस करत आहेत.