जेलमधून पतीला सोडविताना पत्नीच अशी गेली तुरुंगात

जेलमध्ये असलेल्या पतीला सोडवायला पैशांची गरज होती. म्हणून एका महिलेने थेट अवैधरित्या शस्त्रविक्री सुरू केली. पण हा प्रकार महिलेलाच जेलमध्ये घेऊन गेला.

Updated: Oct 6, 2016, 09:54 PM IST
जेलमधून पतीला सोडविताना पत्नीच अशी गेली तुरुंगात title=

पुणे : जेलमध्ये असलेल्या पतीला सोडवायला पैशांची गरज होती. म्हणून एका महिलेने थेट अवैधरित्या शस्त्रविक्री सुरू केली. पण हा प्रकार महिलेलाच जेलमध्ये घेऊन गेला.

पुणे पोलिसांनी पद्मा जाधव या महिलेला अटक केलीय. ही महिला अवैध शस्त्र विकण्यासाठी पुण्यातल्या सोमवार पेठेत आली होती. त्यावेळी पोलिसांनी तिला अटक केली. 

पद्मा जाधव आणि तिच्या साथीदाराकडून तब्बल 5 पिस्तुलं आणि 112 राऊंड जप्त करण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातून त्यांनी ही शस्त्र आणली होती.