छोटे पक्ष - अपक्षांचा भाव वधारला; नवीन गेम सुरू?

भाजप स्वबळावर अल्पमतातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असलं तरी दुसरीकडे राज्यातले छोटे पक्ष आणि अपक्ष एकत्र येऊन दबाव गट निर्माण करण्याच्या हालचाली करत आहेत. 

Updated: Oct 28, 2014, 11:26 AM IST
छोटे पक्ष - अपक्षांचा भाव वधारला; नवीन गेम सुरू? title=

मुंबई : भाजप स्वबळावर अल्पमतातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असलं तरी दुसरीकडे राज्यातले छोटे पक्ष आणि अपक्ष एकत्र येऊन दबाव गट निर्माण करण्याच्या हालचाली करत आहेत. 

भाजप-शिवसेनेमध्ये तडजोड होऊन सर्वमान्य तोडगा न निघाल्यास अपक्ष आणि छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त होणार, हे निश्चितच आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष आमदारांची नुकतीच भेट  घेतली. 

दरम्यान, हॉटेल ट्रायडंटमध्ये काही अपक्ष आमदारांची बैठक सुरू आहे. यासंदर्भात अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी संपर्क साधला त्यांनी  भाजप नेते राजनाथ सिंह यांनी आपल्याला भेटायला बोलावलं असून आपण लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय. 

यावेळी, 'भाजपनं सन्मानाची वागणूक दिली तर भाजप सरकारमध्ये सहभागी होऊ' असं रवी राणा यांनी स्पष्ट केलंय. पण, अपक्षांची भूमिका आपण बैठकीनंतरच स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.