...तर अजित पवार आणि तटकरेंनाही अटक होईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते, असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत. 

Updated: Oct 23, 2015, 07:30 PM IST
...तर अजित पवार आणि तटकरेंनाही अटक होईल title=

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते, असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत. 

जळगावमध्ये काल दसऱ्यानिमित्त झालेल्या रावणदहन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सिंचन घोटाळयात अधिकारी-ठेकेदारांना जेलमध्ये जावं लागले. पवार आणि तटकरे ACB चौकशीत दोषी आढळले, तर त्यांच्यावरही तशीच कारवाई केली जाईल, असं महाजन म्हणाले. 

३०८ बोगस कंपन्या : सोमय्या

दरम्यान, सिंचन घाटळयाप्रकऱणी भाजपचे खासदास किरीट सोमय्या यांनी अजित पवार आणि सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केलेत. या दोघांनी ३०८ बोगस कंपन्या स्थापन केल्याचा दावा करतानाच एफ ए कंस्ट्रक्शन कंपनीने ८०० करोड रुपये युनियन बँकेतून काढल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. त्यांनी या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडे पत्राद्वारे तक्रार केली. 

या सर्व बँक व्यवहारात लक्ष घालून तटकरे आणि पवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्यांनी केलीये. दुसरीकडे ACB चौकशीतूनच सत्य बाहेर येईल, असं सांगत तटकरेंनी या प्रकरणी अधिक बोलणं मात्र टाळले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.