महाराष्ट्रातील या शहरात सर्वाधिक इसिसचे फॉलोवर्स....

 क्रूर कारवायांसाठी  कुख्यात असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरीया अर्थात  इसिसचे मायाजाल मराठवाड्यात चांगलेच पसरत असल्याचं पुढं येतय..  सोशल मीडियावर अँक्टीव असलेल्या सुशिक्षित मुस्लिम तरूणांना इसिसनं मोहिनी घातली असून  इसिसच्या  जाळ्यात अडकलेल्या मराठवाड्यातील तब्बल 23 तरुणांचे एटीएसनं समुपदेशन केल्याचं आता समोर आलय.. त्यामुळं ही पाळमुळं चांगलीच खोलवर रुजत असल्याचं समोर येतय..

Updated: Apr 13, 2017, 05:34 PM IST
महाराष्ट्रातील या शहरात सर्वाधिक इसिसचे फॉलोवर्स.... title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद :  क्रूर कारवायांसाठी  कुख्यात असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरीया अर्थात  इसिसचे मायाजाल मराठवाड्यात चांगलेच पसरत असल्याचं पुढं येतय..  सोशल मीडियावर अँक्टीव असलेल्या सुशिक्षित मुस्लिम तरूणांना इसिसनं मोहिनी घातली असून  इसिसच्या  जाळ्यात अडकलेल्या मराठवाड्यातील तब्बल 23 तरुणांचे एटीएसनं समुपदेशन केल्याचं आता समोर आलय.. त्यामुळं ही पाळमुळं चांगलीच खोलवर रुजत असल्याचं समोर येतय..

इसिस या संघटनेनं मराठवाड्यात पाळमुळं रूजवायला सुरुवात केल्याचं माहिती समोर येतय.. त्यात मुस्लिम तरूणांना सोशल मीडियांच्या माध्यमातून भुरळ घालत इसिसचे कमांडर त्यांचा समावेश कऱण्याचा प्रयत्न करताय... 8 महिन्यांपूर्वी इसिससोबत संबंधीत असलेल्या  औरंगाबादच्या वैजापूरचा इरफान पठाण, परभणीतील शाहिद आणि इक्बाल, यांच्यासह हिंगोलीतील रईसोद्दीन नावाच्या शिक्षकाला एटीएसन अटक केली होती.  परभणीच्या तरूणांनी तर बॉम्ब बनवून घातपात करण्याचाही कट आखला होता , मात्र सुदैवानं ते यशस्वी होऊ शकले नाही.  

तेव्हापासूनच मराठवाठ्यात इसिसचे नेटवर्क उभ राहत असल्याचं समोर आलय त्यादृष्टीनं एटीएस लक्ष ठेवून आहे, याच आरोपींच्या चौकशीतून अधिकची माहिती पुढं आली आणि या तरूणांच्या सोशल अॅक्टीव्हीटीवर एटीएस लक्ष ठेवून होते, त्यातून या तरूणांची इसिसच्या कमांडरसोबत चँटीग सुरू असल्याचंही तपासात पुढं आली.

त्यातून मराठवाड्यातील वेगवेगळ्या शहरातून एटीएसनं 23 तरुणांना ताब्यात घेतले, एकट्या औरंगाबादमधून 8 तरुण ताब्यात घेण्यात आले आणि इसीसचा विळखा कसा विषारी आहे या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे, सुत्रांच्या माहितीनुसार या सर्व तरूणांना समुपदेशन करुन सोडून देण्यात आले असले तरी त्यांच्यावर एटीएस आणि एनआयएची बारीक नजर असल्याचंही कळतय..

सोशल मिडीयाच्या माध्यमातून भुरळ घालण्यात येत असलेले हे तरून उच्चशिक्षित आहे यातील काही व्यापारी, तर काही इंजिनिअर सुद्दा आहेत, इसिसचे कमांडर सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत संवाद साधतात, आणि त्यातून त्यांना सिरीयालाही बोलवत असल्याचं तपासात समोर आलय.. मात्र एटीएसची या सगळ्या प्रकारावर नजर असल्यानं पुढील अनर्थ सध्यातरी टळलाय.

 मराठवाड्यात या आधीही सीमी, इंडियन मुजाहिदीन यांनी जाळ पसरवलं होतं,  फय्याज कागजी, जबीउद्दीन अन्सारी, हिमायत बेग , हे सर्व अतिरेकी मराठवाड्यातीलच होते,  वेरूळ शस्त्रसाठा, जर्मन बेकरी ब्लास्ट, मुंबई लोकल ब्लास्ट या सगळ्यांची पाळमुळं मराठवाड्यात होतीच, मात्र या संघटनाचं कंबंरड मोडल असल्यानं इसिसला पोषक वातावरण मिळालं, आणि त्याचाच फायदा इसिस घेत आहे.. राज्यात अनेक मोठ्या शहरांमधून इसिसला फॉलोअर्स आहेत.

इसिसच्या फॉलोअर्स मध्ये महाराष्ट्रात औरंगाबाद प्रथम आहे, दुस-या क्रमांकावर नागपूर, तिस-या क्रमांकावर नाशिक आणि चौथ्या क्रमांकावर पुणे असल्याचं बोललं जातय..  तर देशात मध्यप्रदेशातून खंडवा मधून सगळ्यात जास्त फॉलोअर्स असल्याचं समोर आलय.. याच खंडवातील दोन अतिरेक्यांचे औरंगाबादेत 2 वर्षांपूर्वी एन्कॉउंटर ही कऱण्यात आला होता.

इसिसचा हा प्रसार निश्चितच धक्कादायक आहे, मराठवाड्यात आधीच ब-याच सघंटनांची स्लिपर सेल असल्याचं बोललं जातय तसा इतिहासही आहे, त्यात आता इसिस म्हणजे कहरच, एटीएस एनआयए लक्ष ठेवून आहेच, मात्र असं असलं तरी तरूणांना ज्या पद्धतीनं भुरळ घालण्यात येतेय आणि त्यासाठी सोशल मिडीयाचा वापर होतोय यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे...