रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधातली मोर्चाची तारीख शिवसेनेकडून पुढे ढकलण्यात आली आहे. या आधी केलेल्या घोषणेनुसार आज १७ मार्चला, शिवसेनेनं जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआंदोलनाची हाक दिली होती.
रत्नागिरीतलं जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाचं कार्यालय बंद पाडण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार होता. मात्र आता हा मोर्चा १९ मार्चला काढला जाणार असल्याचं शिवसेनेनं जाहीर केलंय. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना खासदार विनायक राऊत करणार आहेत.
दरम्यान या जनआंदोलनाचं नेतृत्व कोणी करायचं या मुद्यावरुन, शिवसेनेत शितयुद्ध सुरु असल्यानं तारीख पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. तर सवंग प्रसिद्धीसाठी शिवसेनेची ही स्टंटबाजी असल्याचा आरोप, स्थानिक भाजपनं केलाय.
शिवसेनेने प्रत्त्युत्तर देताना पराजयाची हॅटट्रिक करणाऱ्यांना आणि जनतेसोबत नसलेल्यांना जनआंदोलन काय समजणार असा प्रतिटोला, शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वानं भाजपला लगावलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.