जळगाव : 500 आणि हजारच्या नोटा बंदीनंतर महापालिका कर वसुलीची चांदी झाली आहे. महापालिकेच्या इतिहासात महापालिका तसेच नगरपालिका घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल कधीच नव्हती इतकी वसुली मोदींच्या एका निर्णयाने झाली आहे.
आर्थिक डबघागाईस गेलेली जळगाव महापालिका एका दिवसात मालामाल झाली आहे. ४ कोटींची वसुली जळगाव महापालिकेत झाली आहे आणि अजूनही भरणा चालूच आहे. अजून सात आठ कोटी कर भरणा होऊ शकतो, असा कर भरणा महापालिकेच्या इतिहासात कधीच झाला नव्हता असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.