कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला. शिवसेना उमेदवारांनी अर्ज भरला असताना भाजपनेही शेवटच्या दोन तासात आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.

Updated: Nov 7, 2015, 07:34 PM IST
कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल title=

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला. शिवसेना उमेदवारांनी अर्ज भरला असताना भाजपनेही शेवटच्या दोन तासात आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.

अधिक वाचा : केडीएमसी महापौर : शिवसेनेचे उमेदवार जाहीर, भाजपचा सेनेला प्रस्ताव

केडीएमसीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपच्या उमेदवारांकडून या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी राहुल दामले तर उपमहापौर पदासाठी विक्रम तरे यांनी अर्ज भरला.

अधिक वाचा : कल्याण-डोंबिवलीच्या सत्तासमिकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

अर्ज भरायला अवघ्या दोन तासांचा अवधी शिल्लक राहिला असताना आता शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून महापौरपदासाठी राजेंद्र देवळेकर आणि उपमहापौर पदासाठी राजेश मोरे यांची नावे जाहीर झालीत. त्याआधी कल्याण-डोंबिवलीच्या सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली.  यावेळी भाजपकडून महापौर पदासाठी शिवसेनेपुढे अडीच-अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.

मात्र, या प्रस्तावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. पहिली अडीच वर्ष महापौरपदासाठी आरक्षण नसल्याने पहिली अडीच वर्षांची टर्म आपल्यालाच मिळावीत, यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात चढाओढ आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.