व्हिडीओ | रिक्षा चालकाकडून ट्रॅफिक पोलिसाला मारहाण

कल्याणमध्ये ट्रॅफिक हवालदार आणि रिक्षा चालकात धक्काबुक्की झाली आहे, यावेळी रिक्षा चालकाने हवालदाराला धक्काबुक्की केल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. तसेच रिक्षा चालक हा आपल्या युनिफॉर्ममध्ये नसल्याचंही दिसून येत आहे.

Updated: Nov 29, 2015, 10:20 PM IST
व्हिडीओ | रिक्षा चालकाकडून ट्रॅफिक पोलिसाला मारहाण title=

कल्याण : कल्याणमध्ये ट्रॅफिक हवालदार आणि रिक्षा चालकात धक्काबुक्की झाली आहे, यावेळी रिक्षा चालकाने हवालदाराला धक्काबुक्की केल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. तसेच रिक्षा चालक हा आपल्या युनिफॉर्ममध्ये नसल्याचंही दिसून येत आहे.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

बॅच आणि लायसन्स मागितल्याच्या रागातून रिक्षा चालकाने पोलिस हवालदारावर अरेरावी केल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली या भागात नेहमीच हवालदार आणि रिक्षा चालकांची भांडणं होत असतात.

बॅच आणि लायसन्स मागितल्यानंतर रिक्षा चालक अरेरावी करतात असा आरोप पोलिसांकडून होत असतो, तर आपल्याला नको त्या कलमाखाली दंड दिला जातो, लायसन्स दिल्यानंतरही रिक्षा जमा करण्याची धमकी दिली जाते. या व्हिडीओत रिक्षा चालक युनिफॉर्मवर दिसत नाहीय, यावरून रिक्षा चालकाचीही अरेरावी असल्याचं दिसून येत आहे.

पाहा रिक्षा चालकाची ट्रॅफिक हवालदाराला मारहाण

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.