खामगाव बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारने घेतली गंभीर दखल

  खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. 

Updated: Nov 4, 2016, 10:11 PM IST
खामगाव बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारने घेतली गंभीर दखल  title=

 बुलढाणा :   खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. 

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं महिला आयपीएस अधिका-याच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. तर एसआयटी स्थापन करण्यात आली असून नागपूच्या सीआयडी प्रमुखही चौकशीसाठी बुलढाण्याला जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीष माथूर यांनी दिलीय. 

या बलात्कारप्रकरणी तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी इतुसिंग पवार आणि संस्थाचालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  या सर्वांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.