ओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून केएमटी चालकाला मारहाण

कोल्हापुरात केएमटीच्या चालकानं गाडीला ओव्हरटेक करु न दिल्यानं रागाच्या भरात केएमटीच्या चालकास बेदम मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

Updated: Jul 7, 2016, 11:05 AM IST
ओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून केएमटी चालकाला मारहाण  title=

कोल्हापूर : कोल्हापुरात केएमटीच्या चालकानं गाडीला ओव्हरटेक करु न दिल्यानं रागाच्या भरात केएमटीच्या चालकास बेदम मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

आश्चर्याची बाब म्हणजे, चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना प्रवाशांनी या टोळक्याला रोखण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. जवळपास पंधरा मिनिटं ही मारहाण सुरू होती.

पेठ वडगावातल्या अंबाबाई मंदिर परिसरात हा सर्व प्रकार घडलाय. याप्रकरणी आता चालक कुशाबा जोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पेठवडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

तसंच पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. तर जोशी यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.