नोटबंदीनंतरही महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत आठ लाखांच्या जुन्या नोटा

नोटबंदीनंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील दान पेटीत 500 आणि 1000 रुपयांच्या 8 लाख 15 हजार रुपये टाकण्यात आले आहेत.

Updated: Dec 30, 2016, 07:32 PM IST
नोटबंदीनंतरही महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत आठ लाखांच्या जुन्या नोटा  title=

कोल्हापूर : नोटबंदीनंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील दान पेटीत 500 आणि 1000 रुपयांच्या 8 लाख 15 हजार रुपये टाकण्यात आले आहेत. नोटबंदीनंतर दान पेट्यांमध्ये 500 आणि 1000 च्या नोटामध्ये जास्त वाढ होईल असं वाटलं होत. पण परिस्थिती वेगळीच दिसून आलीय.

महालक्ष्मी देवीच्या दान पेटीत चलनातुन बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा टाकु नये असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आहवान केलं होतं. पण तरी देखील भक्तांनी 500 आणि 1000 रुपयांच्या 8 लाख 15 हजार रुपयांच्या नोटा महालक्ष्मी देवीच्या दान पेटीत टाकल्यात.