कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय...
नव्या नियमानुसार राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सर्वच ठिकाणी आडत व्यापारी भरतात. पण कोल्हापुरातल्या व्यापाऱ्यांचा मात्र अडत भरण्यास विरोध आहे. त्यासाठीच या व्यापाऱ्यांनी भाज्यांची उचल थांबवली आहे.
सरकरान भाजीपाला नियमन मुक्त केलाय. त्याचप्रमाणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून आडत वसूलीही थांबवण्यात आलीय. त्याला आता जवळपास सहा महिने झालेत. त्यानंतर कोल्हापूरच्या व्यापा-यांनी हा बंद पुकारलाय.
व्यापाऱ्यांच्या या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र विरोध केलाय. कायद्यानुसार व्यापारी आ़डत देणार नसतील, तर जशास तसा धडा शिकवू असा इशारीही संघटनेनं दिला आहे.