कोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का

कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली. 

Updated: Nov 2, 2015, 02:45 PM IST
कोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का title=
संग्रहीत

मुंबई : कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली. 

अधिक वाचा : Live Update : महापालिका आणि नगरपंचायत निवडणूक निकाल

 

रत्नागिरीत चार ठिकाणी पोटनिवडणूक झाली. दरम्यान, शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेश शेट्ये विजयी झालेत. त्यामुळे हा सेनेला धक्का मानण्यात येत आहे. पोट निवडणुकीत शिवसेना - २, राष्ट्रवादी - २ जागांवर विजयी झाली. शिवसेनेच्या ऋतुजा देसाई ( १८२८) , पूजा सुर्वे (१७९०) तर राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये (१८५१) , रुबीना मालवणकर (१७७४) हे विजयी झालेत. तर मंडणगडमध्ये राष्ट्रवादी आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकत शिवसेना आणि भाजपला जोरदार धक्का दिला.

सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील निवडणूक प्रतिष्ठीत करण्यात आली होती. कसई  दोडामार्ग नगरपंचायतवर  भाजप-सेना युतीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. युतीला १० तर आघाडीला अवघ्या ६ जागा  मिळाल्यात. तर दुसरीकडे मनसेने अवघ्या ४ जागा लढविल्या होत्या. मनसेनेने खाते खोलले.

या निवडणुकीत जनतेने आपल्याला कौल दिलेला असून जनतेला अपेक्षित असा विकास करू, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा उपाद्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी उपस्थित होते. या निकालानंतर सिंधुदुर्गात युतीकडून शहरात मोठी रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला. या रॅलीत माजी आमदार , भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, राजन म्हापसेकर, रंगनाथ गवस, सेनेचे संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांसह सर्व विजयी उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.