कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर

 1 जुलै 2014पासून कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या धावणार आहेत.

Updated: Jun 25, 2014, 08:14 PM IST
कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर title=

मुंबई : 1 जुलै 2014पासून कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या धावणार आहेत.

कोकणात पावसाचा जोर असतो. पावसाळ्यात खबरदारी म्हणून कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या ट्रकच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे प्रशासन दक्ष असून धोकादायक ठिकाणी खबरदारीच्या उपाय-योजना केल्या आहेत. रत्नागिरी ते वेरणा (गोवा) दरम्यान एआरटी (एक्सिडेंट रिलिफ ट्रेन), आपात्कालीन व्यवस्था म्हणून मेडिकल व्हॅन तयार ठेवण्यात आली आहे. 25 स्थानकादरम्यान, खबरदारी घेण्यात आली आहे. मोबाईल फोनधारक अधिकारी, कर्मचारी, लोको पायलट, स्टेनश मास्तर, ट्रेन गार्ड, वॉकी-टॉकीसह अधिकारी सर्तक राहणार आहेत.

तर काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आलाय. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2014 पर्यंत हे पावसाळी वेळापत्रक असणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली. अधिक माहीती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध  आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.