कोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टर 45 जागांवर भरती

कोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टरच्या 45 जागा भरावयाच्या आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ही संधी कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यातील भूमीपूत्र उमेदवारांना आहे.

Updated: Jan 9, 2015, 04:56 PM IST
कोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टर 45 जागांवर भरती title=

मुंबई : कोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टरच्या 45 जागा भरावयाच्या आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ही संधी कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यातील भूमीपूत्र उमेदवारांना आहे.

भूमी विस्थापिक उमेवार सहायक स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज करु शकतात. वेतन श्रेणी 5200-20200-ग्रेड पे 2800 रुपये, अशी आहे. उमेदवारांनी आपला अर्ज 5 फेब्रुवारी 2015 पर्यंत सायंकाळी 5.30 पर्यंत पाठवायचा आहे. भरतीबाबत अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थऴावर पाहू शकता.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कारवार, उडपी, दक्षिण कन्नड जिल्हा येथील भूमीपूत्र पात्र उमेवारांनी आपला अर्ज बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबी 400615 या पत्त्यावर पाठवावा. अर्जावर पदाचा उल्लेख करावयाचा आहे.

जाहिरात पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.