कोकणात जाणाऱ्या जलद गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा

कोकणात जाणाऱ्या ५ ते ६ गाड्या सणासुदीच्या काळात दिवा रेल्वे स्थानकात थांबणार असल्याच कल्याणचे  खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच दिवा येथील समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Updated: Feb 25, 2015, 11:08 AM IST
कोकणात जाणाऱ्या जलद गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा title=

ठाणे : कोकणात जाणाऱ्या ५ ते ६ गाड्या सणासुदीच्या काळात दिवा रेल्वे स्थानकात थांबणार असल्याच कल्याणचे  खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच दिवा येथील समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होळी आणि गणेश उत्सवाच्या काळात दिवा  येथील प्रवसी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. या ठिकाणी  गाड्या थांबाव्यात याकरिता खासदार शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी पत्र व्यवहार केला होता. त्यानंतर ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान, दिवा येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे अधिकारी यांच्यासोबत खासदार शिंदे यांनी दौऱ्याचे केले होते. यावेळी अधिकाऱ्यासमवेत त्यांनी पाहाणी केली.  खासदार श्रीकांत शिंदे , लोकप्रतिनिधी , रेल्वे अधिकाऱ्यांनी या समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली.

 दिवा स्थानकात मध्यंतरी प्रवाशांचा कडेलोट झाला होता. येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथील समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल, याबाबत भाष्य केले होते. तसेच दिव्यात फास्ट लोकल थांबावी तसेच दिवा ते शिवाजी टर्मिनस ,अशी लोकल सुरु कारावी, अशी प्रवाशांची मागणी होती. या मागणीचा पाठपुरावा देखील सुरु असल्याच खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दिवा पूर्व येथे नवीन तिकीट खिडकी सुरु करण्यात येणार आहे तसेच नवीन रॉबदेखील तयार करण्याचे काम सुरु होणार आहे. ३ आणि ४ वर शेड टाकणे तसेच भविष्यात रेल्वे स्थानकावर शौचालये बांधण्यासाठी खासदार निधीतून मदत करण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.