कोकण रेल्वेचे मोबाईल अॅप सुरु

कोकण रेल्वेने आपले स्वत:चे मोबाईल अॅप सुरु केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेची माहिती स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे.

Updated: Nov 25, 2014, 06:49 PM IST
कोकण रेल्वेचे मोबाईल अॅप सुरु title=

मुंबई : कोकण रेल्वेने आपले स्वत:चे मोबाईल अॅप सुरु केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेची माहिती स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे.

कोकण रेल्वेचे (Konkan Railway) मोबाईल अॅप कोणत्याही अॅड्रॉईड (Android) आणि ब्लॅकबेरी (BlackBerry)स्मार्टफोनवर डाऊनलोड करु शकता. स्मार्टफोनचा वापर आजकाल सऱ्हार्स सर्वजण करीत असल्याने ही सुविधा देण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला.

हे मोबाईल अॅप कोकण रेल्वेच्या संगणकीय विभागाने विकसित केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक नाहीतर रेल्वे नेमकी कोठे आहे. याबाबत (सध्याची स्थिती) माहिती मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे कार्यालयात फोन करुन गाड्यांबाबत माहिती विचारण्याची गरज या अॅपमुळे भासणार नाही.

या अॅपच्या माध्यमातून कोकण रेल्वेच्या संकेतस्थळालाही भेट देता येणार आहे.  हे अॅप गूगल स्टोअरवर जाऊन तुम्ही डाऊनलोड करु शकता.

या अॅपवर ही माहिती मिळणार...

1. कोकण मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक

2. कोकण मार्गावरील गाड्या सध्याची स्थिती

3. कोकण रेल्वेचे संकेस्थळवर अधिक माहिती शोधू शकता

4. कोकण रेल्वे फोटो गॅलरी

कसं कराल अॅप डाऊनलोड

" https://play.google.com/store/apps/details?id=org.krcl.krclapp ".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.