फोंडा घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद

 कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या फोंटा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. दरड बाजुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 

Updated: Jul 18, 2014, 01:00 PM IST
फोंडा घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद title=

ओरोस : कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या फोंटा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. दरड बाजुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 

कोल्हापूर सिंधुदुर्ग मार्गाला जोडणा-या फोंडा घाटात आज सकाळी दरड कोसळल्यानं या मार्गावरून जाणारी वाहतूक बंद झालीय. घाटात सुमारे १५० मीटर भागात ही दरड कोसळलीय. रस्त्यावर दगड आणि माती येऊन पडली असल्यामुळे रस्ता पूर्ण ब्लोक झालाय. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद पडलीय.

या मार्गावरून जाणारी वाहतूक सध्या गगनबावडा मार्गे वळविण्यात आलीय. दरड हटविण्याचं काम सार्वजनिक विभागाचे कामगार करतायत. या भागात सकाळी रिमझिम पाऊस असल्याने दरडी हटविण्याच्या कामात अडचणी निर्माण होत होत्या.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.