दरड कोसळल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

खंडाळा घाटाजवळ दरड कोसळून मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी येथे पाहायला मिळत आहे.

Updated: Aug 1, 2015, 08:40 PM IST
दरड कोसळल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत title=
संग्रहीत

पुणे : खंडाळा घाटाजवळ दरड कोसळून मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी येथे पाहायला मिळत आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक शनिवारी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. सकाळी सव्वादाहाच्या सुमारास महामार्गावरील कामशेत बोगद्यात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. त्यामुळे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सध्या ही वाहतूक सुरू करण्यात काही प्रमाणात सुरूआहेत.

यापूर्वी द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोगदा आणि आडोशी बोगदा या दोन ठिकाणी  २२ जून आणि १९ जुलै रोजी दरडी कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन मुंबई व पुणे या शहरांचा संपर्क तुटला  होता.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.