लातुरात देशमुख गड ढासळला, भाजपची मुसंडी

 अमित देशमुख यांना काँग्रेसचा लातूर गड कायम राखण्यात अपयश आले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा धुव्वा उडवलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2017, 05:23 PM IST
लातुरात देशमुख गड ढासळला, भाजपची मुसंडी title=

LIVE पाहा : नगरपालिका निवडणूक निकाल २०१७

लातूर : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे. काँग्रेसचे दिव्ंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा गड शाबूत ठेवला होता. मात्र, त्यांचे पुत्र अमित देशमुख यांनी हा गड कायम राखण्यात अपयश आले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा धुव्वा उडवलाय.

चंद्रपूर, लातूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांमध्ये आज मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सत्ताधाऱ्यांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, भाजप नेते संभाजी निलंगेकर-पाटील यांचे प्रतिष्ठापणाला लागली होती. मात्र निलंगेकर-पाटील यांनी बाजी मारल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

आधीचे पक्षीय बलाबल

लातुरात देशमुख गड ढासळला, भाजपची मुसंडी

भाजपणे स्पष्ट बहुमत मिळवले असून ३६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस २२ तर भाजप ३६ जागांवर आघाडीवर होते. काँग्रेसची येथील सत्ता भाजपने हिसकावून घेतली आहे. त्यामुळे देशमुख गडाला जोरदार हादरा बसला आहे.