म्हशीचं पारडू फस्त केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू

जळगावा जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. म्हशीचं पारडू फस्त केलेला एक बिबट्या मृत अवस्थेत शेतात आढळून आलाय. 

Updated: Sep 19, 2015, 07:54 PM IST
म्हशीचं पारडू फस्त केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू title=

जळगाव : जळगावा जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. म्हशीचं पारडू फस्त केलेला एक बिबट्या मृत अवस्थेत शेतात आढळून आलाय. 

शनिवारी एरंडोल जिल्ह्यातील जवखेडा इथल्या एका शेतात गावाकऱ्यांना एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर तातडीनं वनविभागाला पाचारण करण्यात आलं. 

हा मृत बिबट्या अवघ्या दोन ते अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या होता. मृत्यूच्या अगोदर या बिबट्यानं जवळच्याच गावातील अवघ्या १०० मीटर अंतरावर एक म्हशीचं परडू फस्त केल्याचंही गावकऱ्यांच्या लक्षात आलंय.

तर, या बिबट्यानं विषारी पदार्थ खाल्ल्यानं किंवा त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्यानं त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, या बिबट्याच्या शवाचं विच्छेदन झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचं खरं कारण समजू शकेल. 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.