कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

तालुक्यातील काझड गावात शेतक-यांनं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. नामदेव झगडे असं या शेतक-याचं नाव आहे. 

Updated: Jun 4, 2016, 05:50 PM IST
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या  title=

इंदापूर : तालुक्यातील काझड गावात शेतक-यांनं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. नामदेव झगडे असं या शेतक-याचं नाव आहे. 

नामदेववर युको बँकेच्या बारामती शाखेतून तीन लाखांचं कर्ज घेतलं होते. मात्र दुष्काळ आणि नापिकीमुळे तो कर्ज फेडू शकला नाही. कर्जवसूलीसाठी बँकेनं त्याच्याकडे तगादा लावला. बँक आपल्या शेताचा लिलाव करेल या भितीनं त्यानं विष पिऊन आत्महत्या केली.

या आत्महत्येच्या निषेधार्थ स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं मयत शेतक-याच्या दहाव्याचा विधी बँकेच्या दारात केला. इतकंच नाही तर यापुढे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या झाल्यास बँकेच्या दारात दहनविधी करु, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनंनं दिलाय.