रत्नागिरी : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत भाजपला जोरदार चिमटा काढलाय. त्याचवेळी सल्लाही दिलाय.
महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या विषयात दूध का दूध पानी का पानी होणं गरजेचं होतं. आम्ही विरोधक असताना सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची मागणी करत होते. त्यामुळे आता आम्ही सत्तेत असताना आमचा कारभार पारदर्शक आहे हे जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच खडसेंच्या चौकशीची मागणी केली, असे ते म्हणालेत.
चौकशीच्या काळात त्यांनी सत्तेबाहेर राहिले पाहिजे चौकशीत काही न आढळल्यास त्यांना पुन्हा सन्मानाने आत येता येईल असं म्हणत रामदास कदम यांनी आता मुख्यमंत्रीच योग्य तो निर्णय घेतील असं म्हटलंय.
दरम्यान आम्हीही सत्तेचे भागिदार आहोत शिवसेनेमुळेही सत्ता आहे याचा विसरही भाजपला पडता कामा नेये असंही रामदास कदम म्हणालेत.