लातूरच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

लातूरच्या साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडलाय. यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावर गोळीबार केलाय. 

Updated: Jan 17, 2017, 07:47 PM IST
लातूरच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा  title=

लातूर : लातूरच्या साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडलाय. यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावर गोळीबार केलाय. 

तसंच पेट्रोल पंप मालक श्रीकांत हिरेमठ यांच्यावर हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केलेत. यांत हिरेमठ गंभीर जखमी झालेत. यानंतर दरोडेखोर सात तोळे सोने आणि पन्नास हजाराची रोकड घेऊन पसार झालेत. 

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आरोपींच्या शोधासाठी पोलीसांनी नाकाबंदी केलीय.