close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लक्झरी-टमटम भीषण अपघातात ६ ठार, दोन जखमी

 पांढरी पोल फॅक्टरी येथे लक्झरी बस व टमटम यांच्यात भीषण अपघात पहाटे चार वाजता झाला. या अपघातात ६ जण जागीच ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत. 

Updated: Apr 29, 2016, 12:10 PM IST
लक्झरी-टमटम भीषण अपघातात ६ ठार, दोन जखमी

अहमदनगर : जामखेडपासून जवळपास ८ की मी अंतरावरील पोखरी जवळील पांढरी पोल फॅक्टरी येथे लक्झरी बस व टमटम यांच्यात भीषण अपघात पहाटे चार वाजता झाला. या अपघातात ६ जण जागीच ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अॅपे रिक्षाचा चेंदामेंदा

बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील पोखली येथे ही दुर्घटना घडली. या अपघातात तीन महिला दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अॅपे रिक्षातून ८ जण प्रवास करीत होते. यातील प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मृतांची नावे

अरुण लक्ष्मण गायकवाड, बंदू बाबूराव जोगदंड, राजू बन्सी खलसे, निर्जला अरुण गायवाड, आदित्य राजू खलसे (६ महिने), केसरबाई बंडू जोगदंड अशी मृतांची नावे आहेत. तर मनिषा राजू खलसे (२३) या गंभीर जखमी आहेत. त्यांना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तर तेजस अरुण गायकवाड (१२) हा किरकोळ जखमी असून त्याच्यावरही उपचार सुरु आहेत.