पक्षफुटीच्या भीतीमुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही : मा. गो. वैद्य

पक्षफुटीच्या भीतीमुळे शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाही, असा अंदाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारप्रमुख मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 10, 2017, 07:45 PM IST
पक्षफुटीच्या भीतीमुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही : मा. गो. वैद्य title=

नागपूर : पक्षफुटीच्या भीतीमुळे शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाही, असा अंदाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारप्रमुख मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केलाय.

खिश्यात राजीनामा असल्याची धमकी शिवसेनेचे मंत्री देत आहेत. पण खिशातले राजीनामे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले, तर त्याला अर्थ आहे, असा टोलाही वैद्य यांनी लगावला. 

मुंबई महापालिकेच्या निकालांवर शिवसेना मंत्रीमंडळात राहणार की नाही, हे अवलंबून असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, १८ तारखेला शिवसेनेचे मंत्री राज्य सरकारमधून बाहेर पडणार असे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर मंत्री दिवाकर रावते यांनी आमच्या खिशात नेहमी राजीनामा तयार असतो असे म्हटले होते आणि तो मीडियाला दाखवला होता.