आंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी!

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनमधल्या ज्या घरात वास्तव्य करत होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार असल्याचं समजतंय. खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिलीय.

Updated: Jan 24, 2015, 07:38 PM IST
आंबेडकरांच्या लंडनमधल्या घरासाठी राज्य सरकार मोजणार ३५ कोटी! title=

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनमधल्या ज्या घरात वास्तव्य करत होते ते घर महाराष्ट्र सरकार विकत घेणार असल्याचं समजतंय. खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिलीय.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आणि तमाम भीमसैनिकांना राज्य सरकारनं खुशखबर दिलीय. लंडनमधलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं हेच घर आता राज्य सरकार विकत घेणार आहे. हे घर घरमालकानं ३५ कोटी रुपयांनी विक्रीस काढलं होतं. ही माहिती मिळाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला आणि घर विकत घेण्याचा निर्णय घेतला.

१९२१ - २२ या कालावधीत डॉ. आंबेडकरांचं लंडनमधील या घरात वास्तव्य होतं. 'स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिक्षण घेत या घरात डॉ. आंबेडकर राहायला होते. लंडनमधील 'किंग हेनरी' रस्त्यावर हे २०५० चौरस फुटांची ही वास्तू आहे. 

मात्र, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन विनोद तावडेंनी तमाम भीम सैनिकांना खुशखबर दिली. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर तावडेंनी बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्ताचे अधिकाऱ्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या निवासस्थानाला भेट दिली.
 
येत्या १४ एप्रिलला म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी लंडनमधील हे निवासस्थान स्मारक म्हणून जनतेसाठी खुलं करण्यात येणार आहे. 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.