पुणे: तरुणांची डोकी भडकवणाऱ्या 94 वेबसाईट्स महाराष्ट्र पोलिसांनी ब्लॉक केल्या आहेत. 2015 या एका वर्षामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आयसिसचं भारतामधलं नेटवर्क समोर आलं आहे. तरुणांना आयसिसमध्ये यायला आकर्षित करण्यासाठी या वेबसाईट्सचा वापर होतं होता. त्यामुळे या साईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.
आयसिसचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र एटीएसही आता मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजी वापरण्याच्या तयारीत आहे. आयसिसविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र एटीएस वेबसाईटवरुन जनजागृती करणार आहे.