अलिबाग : राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणार्या या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक मेजवानी चाखण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे.
‘मराठी भाषा दिन’चा उत्साह महाराष्ट्रासह जगभरातील मराठी बांधवांमध्ये पाहायला मिळत आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने या ग्रंथ उत्सवाचे आजोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, 'मराठी भाषा दिनी' मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळण्याची प्रक्रिया लांबली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत साहित्य अकादमीने पाठवलेला सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारला काल मिळाला. त्यामुळे ही प्रक्रिया सुमारे १५ दिवसांनी लांबली आहे. हजारो वर्ष जुनी, संपन्न असलेली आपली मराठी भाषा. मात्र सरकार दरबारी अद्याप मराठीला अभिजात भाषेचा मान मिळालेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.