जालना : शहरातील रोहनवाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ आज एका विवाहित प्रेमी युगलाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.
युगलांच्या मृतदेहाशेजारी एक विषाची बाटली आढळून आली. या दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पांडुरंग कदम हा हा सीआरपीएफचा जवान आहे. तर महिला जालना शहरातील दत्तनगर भागातील राहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सकाळी रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांपैकी काही प्रवाशांना दोघांचे मृतदेह दिसून आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने ही आत्महत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.